‘हा’ बॉल टाकण्याची परवानगी द्या’ ; अश्विनच्या मागणीला मान्यवरांचा पाठिंबा

अश्विन

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) च्या अंतिम सामन्यास अजून काही दिवस शिल्लक आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यासाठी भारतीय खेळाडूंनीही साऊथॅम्प्टन येथे सराव सुरू केला आहे. कोरोना प्रोटोकॉलमुळे भारतीय खेळाडूंना तीन-चार गटात सराव करण्याची परवानगी होती. मात्र आजपासून संपूर्ण भारतीय संघ एकत्र करत आहे.

दरम्यान, टीम इंडियाचा स्पिनर आर. अश्विनने ICC कडे एक मागणी केली आहे. यूट्यूबवरील एका कार्यक्रमात अश्विनने ‘दुसरा’ बॉल टाकण्यासाठी मनगट वाकवण्याची मर्यादा 15 अंशापेक्षा जास्त करण्याची मागणी केली आहे. अश्विनने नुकतीच दक्षिण आफ्रिकेचे माजी परफॉर्मन्स विश्लेषक प्रसन्ना अगोराम यांच्याशी चर्चा केली, त्यावेळी त्याने ही मागणी केली.

अश्विनने या चर्चेमध्ये म्हणाला की, स्पिनर्सना ‘दुसरा’ बॉल टाकण्यासाठी योग्य प्रकारे कोपर वाकवण्याची परवानगी द्यायला हवी. यामध्ये कोणत्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. सर्वाना मायनस 15 ते 20-22 अंशापर्यंत बॉलिंगची परवानगी द्यायला हवी.” अगोराम यांनीही अश्विनच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP