‘नाईट लाईफ यशस्वी करण्यासाठी पहाटेपर्यंत मद्यपानास परवानगी द्या’

मुंबई : पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईत नाईट लाईफ सुरु झाली आहे. 26 जानेवारीपासून नाईट लाईफच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. मात्र मुंबईत नाईट लाईफला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. ‘नाईटलाईफ यशस्वी करण्यासाठी पहाटे साडेतीनपर्यंत मद्यपान करण्याची परवानगी द्या,’ अशी मागणी आहार संघटनेने केली आहे.

याच पार्श्वभूमीवर आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी म्हणाले की, ‘रात्री एक-दोन वाजता कोणी कपडे खरेदी किंवा केवळ खाण्यासाठी बाहेर पडणार नाही. या वेळेत सर्वजण मनोरंजन करण्यासाठी बाहेर पडतील. तसेच खाण्यासह मद्यपानही करतील, पण मद्यपान करण्याची मर्यादा दीड वाजेपर्यंतच आहे, तर नाईटलाईफ पहाटे पाचपर्यंत सुरु राहते. मद्यपान करण्याची मर्यादा दीडवरुन साडेतीनपर्यंत वाढवायला हवी. तसंच हार्ड लिकरची वयोमर्यादा 25 वरुन 21 वर्षे करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी बोलताना केली.

Loading...

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘याशिवाय उत्पादन शुल्क विभागाने परवाना फीमध्ये वाढ केल्यामुळे लहान रेस्टॉरंट बंद करण्याची वेळ आली आहे. रेस्टॉरंट चालकांना व्यवसायात झालेली घट आणि महागाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या वर्षी परवाना शुल्क वाढवू नये,’ असे शिवानंद शेट्टी म्हणाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका