fbpx

नवोदित मंत्र्यांचे आज सायंकाळी होणार खाते वाटप

टीम महाराष्ट्र देशा : पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होईल असे भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत होते. त्यानंतर अनेक वाटाघाटी, रुसवेफुगवे दूर करत आज अखेर राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. भाजप – सेनेतील नेत्यांना मंत्रिपद मिळाले असून निष्क्रिय मंत्र्यांना घरी बसविण्यात आले आहे. आज नऊ जणांना मंत्री म्हणून शपथ दिली. तर नवोदित मंत्र्यांचे खातेवाटप आज संध्याकाळी जाहीर होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमधून ही माहिती दिली.

दरम्यान कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये आलेले राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले असून कृषीखात्याची जबाबदारी सांभाळावी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.