fbpx

महाराष्ट्रात युतीला ४२ पेक्षा जास्त जागा मिळणार : रावसाहेब दानवे

Raosaheb_Danve

टीम महाराष्ट्र देशा : १७ व्या लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्यातील मतदान पार पडले आहे. त्यामुळे आता साऱ्या देशाचे लक्ष २३ मे च्या निकालाकडे आणि देशात कोणाचे सरकार येणार याकडे लागले आहे. तसेच आता एक्झीट पोलनुसार लोकसभा निवडणुकीत ‘एनडीए’ ला बहुमत मिळण्याची शक्यता आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्रात युतीला घवघवीत यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. विविध वाहिन्यांच्या एक्झिट पोलमध्ये एनडीए पुन्हा सत्तेच्या जवळ जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यावर बोलताना रावसाहेब दानवे यांनी ‘महाराष्ट्रात युतीला ४२ च्या वरच जागा मिळतील, ४१ होणार नाहीत. तसंच देशात भाजप 300 जागांचा आकडा पार करुन पुन्हा बहुमत मिळवेल असं मत व्यक्त केले आहे.

दरम्यान, पुढे बोलताना रावसाहेब दानवे यांनी, “मी देशाच्या जनतेचे आभार मानतो. अनेक पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान बनण्याचं स्वप्न पाहिलं, कोणी सायकलवर निघालं तर कोणी हत्तीवर पण जनता भरकटली नाही. राज्यभरातल्या सभांमधून लोकांमध्ये उत्साह दिसत होता”, अशी टीका विरोधकांवर केली आहे.