fbpx

‘युती झाली तरी मावळात भाजपचाच खासदार होईल’

टीम महाराष्ट्र देशा : भाजप आणि शिवसेना यांच्यात युती संदर्भात बोलणी सुरु असल्याची चर्चा सुरु आहे. दोन्ही पक्षाच्या बड्या नेत्यांनी मागील काही दिवसांपासून थेट टीका करण्याचं टाळलं आहे. असं असलं तरीही मावळ लोकसभेतील भाजप पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांची डोकेदुखी वाढवायचा चंग बांधला आहे की काय ? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

मावळ मतदार संघात शिवसेना आणि भाजपमध्ये नेहमीच कुरघोड्या सुरु असतात. लोकसभेत मावळचे नेतृत्व विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे करीत आहेत. मात्र आता बारणे यांच्या नावाला भाजप पदाधिकाऱ्यांनी थेट आणि टोकाचा विरोध सुरु केला आहे. शिवसेना-भाजप युती झाल्यास मावळ मतदारसंघ भाजपला मिळावा, अशी आमची मागणी आहे. मात्र, युती झाली नाही, तरी मावळात भाजपचाच खासदार होईल, अशी सिंहगर्जना विश्वास पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाले पक्षनेते एकनाथ पवार ?
मावळ मतदारसंघ भाजपला मिळावा, अशी आमची मागणी आहे. मावळात समाविष्ट चिंचवड विधानसभेला 30 हजार मतदान वाढले आहे. विधानसभेला सव्वाचार लाख मतदान आहे. या मतदारसंघात आमचं प्राबल्य वाढलं असून शिवसेना-भाजप युती झाल्यास मावळ मतदारसंघ भाजपला मिळावा, अशी आमची मागणी आहे. मात्र, युती झाली नाही, तरी मावळात भाजपचाच खासदार होईल.

पवार यांनी घेतलेल्या या भूमिकेला वरिष्ठ पातळीवर किती गांभीर्याने घेतलं जाईल हा वेगळा विषय असला तरीही युती झाली तरी बंडखोरी होण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे.