fbpx

भारिपचा १२ जागांचा प्रस्ताव आघाडीने फेटाळला

टीम महारष्ट्र देशा : आगामी लोकसभेसाठी सत्ताधारी भाजपला जमीनदोस्त करण्यासाठी राज्यामध्ये समविचारी पक्षांना एकत्र घेवून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची मोर्चेबांधणी सुरु आहे. या आघाडी मध्ये भारिप पक्षाला देखील सहभागी होण्याची इच्छा आहे.याच पार्श्वभूमीवर भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडे लोकसभेसाठी 12 जागांची मागणी केली आहे. मात्र आंबेडकरांची ही मागणी अवाजवी असल्याचं म्हणत काँग्रेसने त्याला स्पष्ट नकार दिला असून त्याऐवजी प्रकाश आंबेडकरांना चार जागांचा प्रस्ताव दिला आहे. अशी माहिती सूत्रांन कडून मिळत आहे.

भारिप साठी काँग्रेसकडून दोन आणि राष्ट्रवादीकडून दोन अशा चार जागा देण्यास आघाडी तयार आहे.या चार जागांमध्ये अकोल्याच्या जागेचाही समावेश आहे. तर सोलापूरची जागा काँग्रेस आपल्याकडेच ठेवणार आहे.

मात्र आता  काँग्रेस-राष्ट्रवादीने दिलेल्या चार जागांचा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांना मान्य नसल्याने  आता पुढे काय होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भारिप आणि एमआयएम यांच्या बहुजन वंचित विकास आघाडीमुळे मोठा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना आघाडीत घेण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठीच त्यांच्याशी बड्या नेत्यांसोबत बैठका होत आहेत. 

2 Comments

Click here to post a comment