fbpx

शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीला युती सरकारच जबाबदार- पगार

चांदवड  :- सध्याच्या परीस्थित शेतकरी हाच स दुखी घटक असून शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीला केंद्र व राज्यातील भाजप – शिवसेना युती सरकारच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार यांनी केला आहे.सरकारने कर्जमाफी जाहीर केली असली तरीही आर्थिक संकटातून सुटका होत नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने तालुकावार ‘शेतकरी संवाद अभियान’ सुरु आहे. यात पक्षाचे पदाधिकारी शेतकऱ्यांशी चर्चा व संवाद साधत आहेत. त्याप्रसंगी अॅड.रविंद्र पगार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर किसान सेलचे अध्यक्ष शंकरराव धोंडगे, तालुकाध्यक्ष डॉ.सयाजी गायकवाड, माजी आमदार उत्तमबाबा भालेराव, युवक अध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, महिलाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, सेवादलाचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, सामाजिक न्याय सेलचे अध्यक्ष यशवंत शिरसाठ, युवती अध्यक्षा प्रतीक्षा बिल्लाडे आदींनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.सुरवातीच्या टप्यात युती सरकारने शेतकरी कर्जमाफी करणारच नाही अशी भूमिका घेतली होती. परंतु विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेनंतर आणि शेतकरी संप आंदोलनानंतर सरकारने मोठा गाजावाजा करून कर्ज माफी जाहीर केली. परंतु सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याची टिका देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार यांनी केली आहे.सरकारने जाहीर केल्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीची १०० % अंमलबजावणी तत्काळ करावी. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्च व अधिक ५०% नफा मिळवून हमीभाव द्यावा. कृषीमालाची खरेदी करावी. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात. रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने रविवार दि.१ ऑक्टोंबर रोजी तालुकावार आंदोलन करण्यात येणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले. यावेळी खंडेराव आहेर, महेश देशमाने, खेमराज कोर, विजय दशपुत्रे, सायरा शेख, विजय जाधव, गौरव कोतवाल,बाडे, रूपम कोतवाल, यांच्यासह कार्यकर्ते मोठया संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

3 Comments

Click here to post a comment