‘मिशन राम मंदिर’ : हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती शक्य : जोशी

मुंबई : शिवसेनेने एका बाजूला स्वबळावर निवडणुका लढविण्याची तयारी सुरु केली असताना आता माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशी यांनी मोठं विधान केलं आहे. हिंदूंनी एकत्र यावे हा आमचा उद्देश स्पष्ट आहे. याद्वारे हिंदुस्तानाचे नाव सार्थ व्हावे असे आम्हाला वाटते. राम मंदिरावरुन मतांचे राजकारण होता कामा नये, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जर एकत्र येणार असेल तर आम्ही भाजपासोबत जाऊ, असं जोशी म्हटले आहे.

शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे शनिवारी सहपरिवार अयोध्येकडे रवाना झाले. तत्पूर्वी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मनोहर जोशी यांनी मातोश्रीवर जाऊन त्यांची भेट घेतली. दरम्यान, ते पत्रकारांशी बोलत होते.मनोहर जोशी म्हणाले, आज ठाकरे कुटुंबीय चांगल्या कामासाठी बाहेर पडले आहेत, त्यांना यश मिळो हीच प्रभू रामचंद्राकडे आमची प्रार्थना आहे. त्यांचा प्रवास सुखरूप व्हावा. मी १९९२ मध्ये अयोध्येला गेलो होते, तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनीही मला सेनाभवनातून असाच निरोप दिला होता.

Rohan Deshmukh

‘मिशन राम मंदिर’ : ‘अयोध्येला निघालो जोशात…राजीनामे मात्र अजूनही खिशात….’

Latur Advt
You might also like
Comments
Loading...