प्रवरानगर कारखान्याच्या उभारणीतील पहिली दोन नावं घेताना काहींना ॲलर्जी; पवारांचा विखेंना टोला

मुंबई:- अहमदनगर जिल्ह्यातील विखे कुटुंबाकडून प्रवरा साखर कारखान्याचं श्रेय पद्मश्री विठ्ठलराव विखेंना देण्यात येते. मात्र, इतर नावांचा उल्लेख होत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात विखे कुटुंबाला अप्रत्यक्ष टोले लगावले आहेत.

देशातील पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगरमधील प्रवरा कारखानाच आहे. त्याच्या उभारणीतील पहिली दोन नावं म्हणजे अर्थतज्ज्ञ धनंजय गाडगीळ आणि अण्णासाहेब शिंदे ही आहेत. पण नावं घेताना काहींना ॲलर्जी होते, असा टोला पवारांनी विखेंना लगावला आहे.

देशामध्ये हरितक्रांती आणण्यात ज्या लोकांचं योगदान होत त्यात बाबू जगजीवनराम, सी. सुब्रहमण्यम यांच्या जोडीने अण्णासाहेब शिंदेंचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. हरितक्रांती प्रत्यक्षात आणण्याच्या उपक्रमात अखंडता आणि सातत्य अण्णासाहेबांमुळेच शक्य झालं. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि अण्णासाहेब शिंदे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. यशवंतराव चव्हाणांना अण्णासाहेबांबद्दल आस्था होती, असंही पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या