योगी आदित्यनाथ आणि सिद्धरामय्या यांच्यात खडाजंगी !

टीम महाराष्ट्र देशा: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील वातावरण चांगलच तापायला सुरवात झाली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ट्विटर युध्द रंगल आहे.

Loading...

योगी आदित्यनाथ कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत. बंगळुरूमध्ये त्यांची जाहीर सभा झाली यावर सिद्धरामय्या यांनी ट्विट करून योगींवर निशाना साधला आहे.

”उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं मी आमच्या राज्यात स्वागत करतो. सर, तुम्ही आमच्याकडून खूप काही शिकू शकता. आता तुम्ही आलाच आहात तर इंदिरा कँटीन किंवा एखाद्या शिधावाटप दुकानावर फेरफटका मारा कारण तुमच्या राज्यात भूकबळी पडतात. त्यामुळे आमचं नियोजन पाहा, तुम्हाला मदत होईल.”, असं ट्विट सिद्धरामय्या यांनी केलं आहे.

तर ”सिद्धरामय्या जी तुम्ही केलेल्या स्वागतासाठी तुमचे मन:पूर्वक आभार. तुमच्या राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्याचं मी ऐकलं आहे. त्यासोबतच प्रामाणिक अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या जातात. यूपीचा एक प्रामाणिक मुख्यमंत्री म्हणून मी तुम्ही माजवलेल्या अराजकतेला नष्ट करण्याचं काम करत आहे.”, अशा आशयाचं ट्विट करून आदित्यनाथ यांनी पलटवार केला आहे.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...