#MeToo : लसिथ मलिंगावर भारताच्या ‘या’ गायिकेने केला विनयभंगाचा आरोप

टीम महाराष्ट्र देशा- हॉलिवूडमधून सुरू झालेली #MeToo मोहिम आता बॉलिवूडमध्येही पसरली आहे. तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वादानंतर अनेक अभिनेत्रींनी, इंडस्ट्रीशी संबंधित महिलांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या, गैरतर्वनाच्या प्रकरणांविरोधात मोहिम उघडली आहे. #MeToo मोहिमेतंर्गत वेगवेगळया क्षेत्रातील महिला त्यांच्याबरोबर झालेल्या लैंगिक जबरदस्तीच्या घटनांना वाचा फोडत असताना आता क्रिकेट विश्वालाही आता ‘मीटू’चा तडाखा बसायला सुरुवात झाली आहे.

सुरुवातीला काही बॉलीवूडमधील मंडळींची नावं यामध्ये आली होती. पण आता आयपीएलमधील मुंबई इंडियन्स या संघातील एका दिग्गज खेळाडूवरही विनयभंगाचे गायिका चिन्मयी श्रीपादने विनयभंगाचा आरोप केला आहे. हा खेळाडू आहे लसिथ मलिंगा. मलिंगावर चिन्मयीने विनयभंगाचा आरोप केला आहे. याबाबत मुंबई इंडियन्स किंवा मलिंगा यांनी कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही.

दरम्यान,आज काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या अटकेची मागणी केली आहे. मुंबईतील ओशिवरा पोलिस स्टेशनबाहेर महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन करुन नाना पाटेकर यांच्या अटकेची मागणी केली. अभिनेते नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केल्यानंतर नाना पाटेकर यांच्यासह चौघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

#MeToo : ‘संस्कारी’ आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप

अंजलीसे खट्टी-मिठी बाते करो, दामानिंयाना अश्लील फोन

You might also like
Comments
Loading...