मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक बंडखोर आमदार आसामची राजधानी गुवाहाटी येथे तळ ठोकून आहेत. आमदारांच्या बंडखोर वृत्तीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चिंता वाढली आहे. काल रात्री त्यांनी सरकारी वर्षा बंगला सोडला आणि त्यांचे वडिलोपार्जित घर मातोश्रीवर स्थलांतरित झाले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार आमदारांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत गंभीर आरोप केले होते. मुख्यमंत्री वेळ देत नाहीत, असा आरोप त्यांनी केला होता.
दरम्यान संजय शिरसाट यांचे २४ मार्च २०२२ रोजी केलेले जुने ट्वीट व्हायरल होत आहे. यामध्ये ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटतांना दिसत आहेत. ट्वीटमध्ये शिरसाट म्हणतात, “महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवास्थानी आयोजीत स्नेहभोजन प्रसंगी उपस्थित राहून साहेबांशी संभाजीनगर पश्चिम मतदार संघातील रखडलेल्या प्रश्नावर चर्चा केली”. हे संजय शिरसाट यांनी केलेले ट्वीट तुफान व्हायरल होत आहे. शिवसैनिकांनी संजय शिरसाट यांची चांगलीच पोलखोल केली आहे.
तसेच शरणापूर येथे ८ मे 2०२२ रोजी झालेल्या “इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिव्हल” कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी देखील संजय शिरसाट उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना भेटले होते. त्यामुळे संजय शिरसाट यांनी दबावात पत्र लिहले का?, अशी चर्चा होत आहे. त्यांनी लिहलेल्या पत्रामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आज औरंगाबाद येथील काही स्थानिक शिवसैनिकांनी पत्र लिहीत ही नाराजी व्यक्त केली होती.
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.ना.उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या "वर्षा" निवासस्थानी आयोजित स्नेहभेजन प्रसंगी उपस्थित राहून साहेबांशी माझ्या संभाजीनगर पश्चिम मतदार संघातील रखडलेल्या प्रश्नांवर चर्चा केली.@CMOMaharashtra @OfficeofUT @ShivSena pic.twitter.com/ZLaOQ1WTU4
— Sanjay Shirsat (@SanjayShirsat77) March 24, 2022
काय म्हणाले होते संजय सिरसाट?
शिवसेना आमदार संजय सिरसाट यांनी उद्धव यांना लिहिलेल्या पत्रात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी लिहिले आहे की, आमच्या समस्या फक्त एकनाथ शिंदे ऐकत असत. वर्षा बंगल्यावर पहिल्यांदाच लोकांची गर्दी पाहून आनंद झाला. गेली अडीच वर्षे आम्हाला प्रवेश मिळत नव्हता. या बंगल्यात प्रवेश करण्यासाठी आपल्या जवळच्या लोकांना नवस करावा लागला. तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी आम्हाला राज्यसभा निवडणुकीपासून दूर ठेवले. आम्हाला अपमानास्पद वागणूक मिळाली. आम्हाला काही अडचण असेल तर आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटायचे होते पण आम्हाला वर्षा निवास येथे बोलावून अनेक तास रस्त्यावर उभे केले जायचे. आमचा फोनही कोणी घेत नव्हत. हे सर्व आमदारांनी सहन केले आहे. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना सांगण्याचा आम्ही अनेकदा प्रयत्न केला. या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या नसतील, मी सहमत आहे. पण आमचा अपमान होत असताना आम्हाला हे सांगायचे होते. एकनाथ शिंदे आमचे सर्व बोलणे ऐकत असत. आम्ही सर्व न्यायासाठी एकत्र आलो आहोत.
महत्वाच्या बातम्या :