अलाहाबादचे नाव बदलून ‘प्रयागराज’ होणार;कॅबिनेटची मंजुरी

टीम महाराष्ट्र देशा- उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जिल्ह्याचे नाव आता प्रयागराज होणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत कॅबिनेटच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. अलाहाबादचे नाव प्रयागराज करण्यात यावे अशी मागणी संत आणि स्थानिकांनी केली होती.

मुख्यमंत्री योगी म्हणाले की, अलाहाबादमध्ये गंगा आणि यमुना या दोन पवित्र नद्यांचा संगम होतो. त्यामुळे अलाहाबाद सर्व प्रयागांचा राजा आहे. त्यामुळेच त्याला प्रयागराज म्हटले जाते. याचे नाव बदलून प्रयागराज व्हावे, अशी अनेकांची इच्छा होती. त्यावर जर व्यापक सहमती झाली, तरच आपण या शहराला प्रयागराज असे नाव देऊ असे मुख्यमंत्र्यांनी ठरविले होते. ही सहमती प्राप्त झाल्यामुळेच हे नवे नामकरण केले जाणार आहे.

१५८३ साली अकबर यांनी प्रयागमध्ये मोठे शहर बसवले. अल्लाचे शहर म्हणून त्याला ‘इल्लाहाबास’ असे नाव दिले. तेथे अलाहाबाद किल्ला निर्माण केला. भारतावर इंग्रजांनी राज्य केले त्यावेळी त्यांनी रोमन लिपीत त्या इलाहाबाद असं नाव लिहिलं. तेव्हापासून हे शहर इलाहाबाद नावानं ओळखलं जातेय.

महादेव जानकारांनी केली देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात ‘ही’ मोठी भविष्यवाणी