टीम महाराष्ट्र देशा : भाजपाच्या ३८व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईमध्ये झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भाषण करत विरोधकांवर जोरदार शरसंधान केलं आहे. सगळे लांडगे आता सत्तेच्या शिकारीसाठी एकत्र आले आहेत. पण हे लांडगेच उद्या दंगली घडवतील, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
Loading...
आमचा सिंहांचा पक्ष आहे, त्यामुळे हे लांडगे आमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत. विरोधकांनी हल्लाबोल यात्रा नव्हे, तर डल्ला मारो यात्रा काढली होती. भाजपाला नेहमीच ब्राह्मणांचा पक्ष म्हणून हिणवलं गेलं. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच भविष्य आहे. संविधानात दिलेलं आरक्षण कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
2 Comments