शेतकऱ्याकंडून जबरदस्तीने वीजबीले वसूल करण्यासाठी हा सगळा बाऊ-फडणवीस

fadanvis

मुंबई : महाराष्ट्रातील वीजबिलाची थकबाकी ७३ हजार कोटींच्या घरात जाऊन पोहोचली आहे. याला सर्वस्वी जबाबदार मागील भाजप सरकार कारणीभूत असल्याचा आरोप मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. या आरोपांना उत्तर देताना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवरच आरोप केला आहे.

याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले कि, ‘वीजबिलांची जी काही थकबाकी आपण दाखवतो. यामध्ये विशेषतः कृषी पंपांसंदर्भात आपण क्रॉस सबसिडी करतो. त्यानंतर जो काही आपले तोटा असतो तो भरुन काढण्यासाठी आपल्याला जे भाडं मिळलं, त्यातून तो आपण भरुन काढतो. त्यामुळे मला असं वाटतं की, जबरदस्तीनं वसूली करण्याकरता हा सगळा बाऊ केला जातोय.

एकीकडे शेतकरी आणि सामान्य नागरिक अडचणीत आहे आणि तो अडचणीत असताना त्याला मदत करण्याऐवजी सरकारला त्यांच्याकडून जबरदस्तीनं वसूली करायची आहे, यासाठीच हे सर्व नाटक सुरु आहे.’ असा घणाघात फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

तर वीजबिलाची थकबाकी पाहता राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी चिंता व्यक्त केली आहे. यावेळी ते म्हणाले की, ‘वीजबिल थकबाकीची वेळेवर वसुली झाली नाही तर राज्य अंधारात जाऊ शकते.’ तसेच भाजपा सरकारने थकबाकीचा डोंगर वाढवल्यामुळे महावितरणवर ही वेळ आल्याचा आरोप देखील यावेळी राऊतांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या