असा लावला नीरव मोदीने ११ हजार ३०० कोटींचा चुना

nirav modi and punjab national bank fraud

नीरव मोदी देशाच्या अर्थकारणात सुनामी घेवून आलेले आणखीन एका घोटाळेबाज बिझनेसमनच नाव. कालपर्यंत ज्याच नाव फोर्ब्ससारख्या मासिकात श्रीमंतांच्या यादीत अग्रभागी घेतल जायचं जात होत, त्याच नीरव मोदीने देशातील दुसऱ्या क्रमांकाची बँक असणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेला तब्बल ११ हजार ३०० कोटींचा चुना लावला आहे. तर दुसरीकडे त्याच्या डायमंड कंपनीची ब्रॅडअॅबेसीडर असणाऱ्या प्रियांका चोप्राची फी देखील देण्यात आली नसल्याच बाब समोर आली आहे. मात्र हा घोटाळा नेमका झाला कसा हा सर्वसामान्यांना पडलेला मोठा प्रश्न आहे.

कोण आहे नीरव मोदी

नीरव मोदी हा मुळचा बेल्जियमचा राहणारा हिरे व्यापारी. १९९९ मध्ये त्याने आपल्या कंपनीची सुरुवात केली. फोर्ब्स मासिकानुसार मोदी याची आजची सं पत्ती ११ हजार कोटींच्या आसपास आहे. फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत त्याचा ८४ व क्रमांक लागतो. त्यांचे ज्वेलरी शोरूम लंडन, न्यूयॉर्क, लास वेगास, हवाई, सिंगापुर, बीजिंग सारख्या 16 शहरांमध्ये आहेत. भारतामध्ये दिल्ली आणि मुंबईत त्याचे बुटिक आहेत.

कसा झाला घोटाळा ?
देशविदेशात व्यापार असणाऱ्या नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँक मुंबई शाखेच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्याची कंपनी असणाऱ्या आर यूएस, सोलर एक्सपोर्ट्स आणि स्टेलर डायमंड्सच्या खरेदी विक्रीसाठी LOU मिळवला. LOU (लेटर ऑफ अंडरटेकिंग) म्हणजे एका बँकेकडून दुसऱ्या बँकेला देण्यात येणारी टाईम गॅरंटी. म्हणजेच एखद्या बँकेने कोणत्याही व्यक्तीला अशी गॅरंटी दिली असेल आणि त्याच्या विश्वासावर दुसऱ्या बँकांनी कर्ज दिल्यास ते संबंधित व्यक्तीने परतफेड न केल्यास गॅरंटी देणाऱ्या बँकेला ते भरावे लागते. याच गॅरंटीच्या भरवशावर भारतीय बँकाच्या विदेशी शाखा असणाऱ्या AXIS बँक, इलाहाबाद बँक आणि युनियन बँक यांनी नीरव मोदीला क्रेडीट लोन दिले. हा घोटाळा समोर आल्यानंतर आता सरकारकडून सर्व बँकांना त्यांचे बॅलन्सशीट सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पंजाब नॅशनल बँकेला करावी लागणार भरपाई
पंजाब नॅशनल बँकेतील काही अधिकाऱ्यांना ह्ताशी धरून नीरव मोदीने हा सर्व घोटाळा केला आहे. यामध्ये या बॅंकेच्या बनावट LOU (लेटर ऑफ अंडरटेकिंग) चा वापर केला गेला. त्यामुळे आता इतर बँकाची देणी हि पंजाब नॅशनल बँकेला भरावी लागणार आहेत. याप्रकरणी पंजाब नॅशनल बँकेच्या काही अधिकाऱ्यांना निलंबित देखील करण्यात आल असून त्यांची चौकशी केली जात आहे.

1 Comment

Click here to post a comment