‘मोदींच्या काळात खाता येत नाही म्हणूनच सगळे चोर एकत्र आले आहेत’  

मुंबई : आजवर अनेकदा देशात गरिबी हटावची घोषणा झाली, पण गरिबी कधी हटली नाही.मोदी सरकारच्या विविध योजनांमुळे खरी गरिबी हटविण्याची सुरुवात झाली आहे. मोदींच्या काळात खाता येत नाही म्हणूनच सगळे चोर एकत्र आले आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महागठबंधनच्या प्रयोगावर टीका केली.
भाजपा युवा मोर्चाच्यावतीने चुनाभट्टी येथील सौमैय्या मैदानावर आयोजित सीएम चषक स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी  मुख्यमंत्री बोलत होते. ‘महागठबंधनमध्ये तुमचा नेता कोण आहे ते तर सांगा. ‘मोदी पंतप्रधान नाही झाले तर मोदींचं नाही तर देशाचं नुकसान होईल. आपल्याला देशाकरता मोदींना पंतप्रधान करावंच लागेल,’ असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
दरम्यान,या कार्यक्रमात सर्वात लक्ष्यवेधी भाषण ठरलं ते भाजपच्या खासदार पूनम महाजन याचं. ”पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सूर्यासारखे आहेत. तर शरद पवार हे शकुनी मामा आहेत,” असं विधान करून महाजन यांनी खळबळ उडवून दिली. महाजन यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरच हल्लाबोल केला. ”महागठबंधन नाही ते तर महाठगबंधन आहे,” असं म्हणत त्यांनी यावेळी विरोधकांच्या आघाडीची खिल्लीही उडवली.
Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
उदयनराजे भोसले यांची निर्दोष मुक्तता
कळत नाही राव ! अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत का मुख्यमंत्री : चंद्रकांत पाटील