नाट्यसंमेलनाशी संबधित आलेल्या सर्व बातम्या खोट्या आहेत

blank

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर आता नाट्यसंमेलनाची तारीख पुढे ढकलली जाणार असल्याची बातमी पूर्णपणे चुकीची आहे. अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे. त्यामुळे नाट्य संमेलनशि संबधित सर्व चर्चांना त्यामी पूर्णविराम दिला आहे.

प्रसाद म्हणाले , ” ही बातमी खोटी असून मुळात नाट्यसंमेलन कधी करायचे आणि कुठे करायचे याविषयी नाट्यपरिषदेचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. राष्ट्रपती राजवट ही नुकतीच लागली आहे. पण आमचं काहीच अजून ठरलेले नसल्याने संमेलन राष्ट्रपती राजवटमुळे पुढे जातंय किंवा होत नाहीये असं काहीही नाही. नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद कोण भुषवणार, नाट्यसंमेलानाचे ठिकाण काय असणार आणि ते कधी करायचं असं काहीही ठरलेलं नाहीये.” असे ते म्हणाले.

तसेच, सध्या 100 व्या नाट्यसंमेलनासाठी मोहन जोशी आणि जब्बार पटेल ही दोन नावे पुढे आली आहेत. यामधून कोणाला अध्यक्ष करायचं याचा ही निर्णय अजून नाट्यपरिषदेच्या कार्यकारी मंडळाने घेतलेला नाही. त्यामुळे जे ठरलंच नाही ते पुढे किंवा मागे ढकललं गेलं याचा प्रश्नच येत नाही., असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या :