माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाचे सारे मुहूर्त तुमचेच : एकनाथ खडसे

eknath khadase

जळगाव: भाजप नेते एकनाथ खडसे हे १७ ऑक्टोबरला म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी राष्ट्रवादीत प्रवेश करतील,अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या. मात्र,आज प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी शनिवारी दुपारी जळगावात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

त्यावेळी ते म्हणाले की ‘राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मला काहीच बोलायचे नाही, नो कमेंट्स असे उत्तर देत या विषयाचे खंडन केले.तसेच ‘माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतचे सारे मुहूर्त तुमचेच आहेत,असे खडसे म्हणाले.

तसेच माध्यमकर्मींनी खडसेंना त्यांच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशाबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, “या विषयाबाबत मला कोणतीही चर्चा करायची नाही”. मी राष्ट्रवादीत जाणार म्हणून जे मुहूर्त सांगितले जात आहेत, ते सारे मुहूर्त तुम्हीच म्हणजेच माध्यमांनी ठरवले आहेत, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादी प्रवेशाचे खंडन केले.आज गृहमंत्री अनिल देशमुख हे रावेर दौर्यावर होते त्यावेळी त्यांनी आणि खडसेंनी भेट देखील घेतली होती.

महत्वाच्या बातम्या-