Share

Grampanchayat Election 2022 | बड्या पक्षांना बाजूला करत ‘या’ ग्रामपंचायतीत सर्व अपक्ष उमेदवार विजयी

(Grampanchayat Election 2022) सातारा : साताऱ्यातील जावळी तालुक्यातील भणंग ग्रामपंचायतीच्या निकालाने अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. निवडणुकीमध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही प्रतिस्पर्धी पॅनलच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. मतदारांनी सर्व अपक्ष निवडून दिले आहेत. त्यामुळे भणंग गावचा निकाल राज्यात लक्षवेधी ठरला आहे.

या ग्रामपंचायतीत अपक्ष उमेदवार निवडून आल्याने भाजप आणि राष्ट्रवादीचं स्थानिक नेत्यांचं पॅनल पराभूत झालं आहे. भणंगचे विजयी उमेदवार हे आम्हाला मानणारे असल्याचा दावा आता स्थानिक भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळं विजयी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या भूमिकेकडे गावकर्यांचं लक्ष लागलेलं आहे.

सरपंचपदी विजयी झालेले गणेश साईबाबा जगताप हे दीपक पवार यांचे समर्थक आहेत. दीपक पवार हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यांच्या समर्थकानं अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सर्व अपक्ष निवडून आल्याने साताऱ्यात हा चर्चेचा विषय झाला आहे. या गावाची लोकसंख्या दोन हजार असून साडेबाराशे मतदार आहेत.

दरम्यान, सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्यातील मोळेश्वर ग्रामपंचायतच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या आमदार मकरंद पाटील यांच्या गटाचा विजय झाला आहे. याबराेबरच पाटण तालुक्यातील माेरगिरी ग्रामपंचायतीत साठ वर्षानंतर सत्तांतर झाले आहे. या ठिकाणी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या गटास धक्का बसला आहे. येथे मंत्री शंभूराज देसाई यांच्या पॅनेलने विजय मिळविला आहे.

महत्वाच्या बातम्या :

(Grampanchayat Election 2022) सातारा : साताऱ्यातील जावळी तालुक्यातील भणंग ग्रामपंचायतीच्या निकालाने अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. निवडणुकीमध्ये भाजप व …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics Satara

Join WhatsApp

Join Now