भारत माता की जय : आजपासून महाराष्ट्रातील महाविद्यालयांची सुरूवात राष्ट्रगीताने

मुंबई : जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. रयतेच्या राजाची जयंती आज राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येतं आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी गड दुमदुमुन गेला आहे.

विद्यार्थ्यांनी देशभक्तीची भावना जपली पाहिजे, त्यांना स्वातंत्र्यामागच्या बलिदानाचे महत्त्व कळावे, यासाठी विद्यापीठ आणि महाविद्यालयातील सार्वजनिक कार्यक्रमाची सुरुवात ही राष्ट्रगीतानेच करावी, यासाठी शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र शासानाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

Loading...

तसेच देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य केले आहे. याची सुरूवात १९ फेब्रुवारीपासून म्हणजे आजपासून महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयांची सुरूवात राष्ट्रगीताने होणार आहे. महाराष्ट्रातील शाळांमध्ये दिवसाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली आणि शाळा सुटण्यापूर्वी देखील सामुहिक राष्ट्रगीताने होते . परंतु आता महाराष्ट्र सरकारच्या नवीन अधिसूचनेनंतर महाविद्यालयांमध्ये देखील राष्ट्रगीताने सुरूवात होणार आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले की, ‘ सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवसापासून सर्व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य आहे. अधिसूचनेनुसार महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीताने कामकाज सुरू होईल. महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करण्याचा हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे,’ अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
तळीरामांना दारूवाचून राहावेना; पठ्ठ्यांनी 'यूट्यूब'वर पाहून घरीच तयार केली दारू
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
अमेरिकेत 'कोरोना'चं थैमान; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितला 'मदतीचा हात'
... तर 'लॉकडाऊन'चा कालावधी वाढवावा लागेल; राजेश टोपे यांची माहिती