गड-किल्ल्यांच्या स्वच्छतेसाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

डोंबिवली: राज्यातील गड-किल्ल्यांची दुरावस्था झाली आहे. मात्र त्यासाठी सरकारवर अवलंबून राहू नये. तर स्थानिक नागरिक, जिल्हापरिषद, ग्रामपंचायत, बँक आणि कारखाने यांनी किल्ल्यांची स्वच्छता आणि दुरुस्ती करावी, असे मत शिवशाहीर बाबाबासाहेब पुरंदरे यांनी माध्यमांशी बोलताना येथे व्यक्त केले.

कल्याणमधील दुर्गाडी किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवडत्या किल्ल्यांपैकी एक असून त्याची देखभाल, दुरुस्ती केली पाहिजे. चांगली स्थळ चांगली ठेवावी हे कोणाच्याही मनात सुद्धा येत नाही. सौदर्यावरील प्रेम आपले कमी झाले, अशी खंतही शिवशाहीर पुरंदरे यांनी मांडली. डोंबिवली जवळील कासारियो सिटीमधील रहिवाशी आणि मराठी उद्योजक सुधीर गुप्ते यांच्या घरी शिवशाहीर पुरंदरे आले होते.

1 Comment

Click here to post a comment
Loading...