पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालये उद्या बंद राहणार

Maratha Kranti Morcha

पुणे : मराठा क्रांती मोर्चाकडून उद्या ( दि 9) रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा – महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीवर मागील दोन आठवड्यापासून संपूर्ण राज्यात आंदोलने केली जात आहेत. या दरम्यान अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण देखील लागल्याचं पहायला मिळाल. उद्या 9 ऑगस्टरोजी पहिल्या मराठा क्रांती मूक मोर्चाला एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्या संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.

बंद दरम्यान अनेक ठिकाणी ठिय्या आंदोलन आणि रास्ता रोको केला जाणार आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात बंद कडकडीत बंद पाळाला जाणार असल्याचं मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांकडून सांगण्यात येत आहे, तर मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात बंद नसणार आहे.

कोकणातील लोकसभा मतदार संघांची जबाबदारी एकनाथ शिंदेंकडे

‘महाराष्ट्र बंद’ला राज्यभर प्रतिसाद