गरळ ओकणे बंद करा ; मांजरेकरांना जडेजाने झापले

टीम महाराष्ट्र देशा- एका बाजूला भारतीय संघातील खेळाडूंचा उत्साह सर्व क्रिकेटप्रेमी वाढवत असताना काही मंडळी मात्र उगीचच संघातील खेळाडूंना डिवचत आहेत. भारताला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर समाचेलक संजय मांजरेकर यांनी लोकेश राहुल, महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांच्यावर टीका केली आहे.

अष्टपैलू खेळाडू जडेजावर टीका करताना मांजरेकर म्हणाले होते की, जडेजा हा कसोटी क्रिकेटमध्ये फक्त गोलंदाज आहे, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो फार महत्वाचा खेळाडू नाही. आता मांजरेकरांच्या याच वक्तव्याचा समाचार जडेजाने त्याच्या खास शैलीत घेतला आहे.

भडकलेला जडेजा म्हणाला की, मी तुझ्यापेक्षा दुप्पट सामने खेळलो आहे आणि अजूनही खेळत आहे. ज्यांनी कष्टानं नाव कमावलं आहे त्यांचा आदर करायला शीक. तुझ्या तोंडून खूप गरळ ओकली जाते. आता बास.