शनिवारवाड्यावर सर्व खासगी कार्यक्रमांना बंदी

पुणे –  पुणे शहराचे वैभव व ऐतिहासिक वारसा म्हणून शनिवारवाड्याकडे पाहिले जाते. पुण्यात पर्यटनासाठी येणारे देश-विदेशातील नागरिक आवर्जून शनिवारवाड्याला भेट देतात. शनिवारवाड्यामुळे पुण्याच्या पर्यटनालादेखील वेगळी ओळख मिळाली आहे. याच शनिवारवाड्यावर ३१ डिसेंबर २०१७ रोजी कोरेगाव भीमा विजयस्तंभाच्या द्विशताब्दीनिमित्त एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.शनिवारवाड्यावर आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेतील वादग्रस्त व भडकावू भाषणानंतर कोरेगाव भीमाची दंगल भडकली व त्याचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले. या पार्श्वभूमीवर यापुढे शनिवारवाड्यावर सर्व प्रकारच्या खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्यात येणार आहे.
यासाठी पोलीस व वाहतूक शाखेच्या वतीने पोलिसांना सूनचा देण्यात आल्या असून, भविष्यात अशा वादग्रस्त कार्यक्रमांमुळे उद्भवणारे वाद टाळण्यासाठी महापालिकेच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत अधिकृत अध्यादेश लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या अधिका-यानी सांगितले.या परिषदेत गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि जेएनजू छात्र संघटनेचा उमर खलिद यांच्या वादग्रस्त व भडकावू भाषणांमुळेच कोरेगाव भीमाची दंगल उसळल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर यापुढे शनिवारवाड्यावर सर्व खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

You might also like
Comments
Loading...