‘…तर प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान करण्याची संघाची सर्व तयारी’

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) ऐनवेळी पंतप्रधानपदासाठी प्रणव मुखर्जी यांचे नाव पुढे करेल. असा दावा केला आहे.

संजय राऊत म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही तर संघाने गरज पडल्यास तर प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान करण्याची सर्व तयारी केली आहे.

आगामी निवडणुकीत सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाला अपेक्षित संख्याबळ जमवता आले नाही तर संघाकडून पंतप्रधानपदासाठी प्रणव मुखर्जींचे नाव पुढे केले जाईल. जेणेकरून त्यांना सत्ता कायम राखता येईल.  तसेच आगामी निवडणुकांमध्ये भाजपला ११० जागा गमवाव्या लागतील. असे राऊत यांनी स्पष्ट केले.

You might also like
Comments
Loading...