सगळे राजकारणी स्वार्थी आहेत. ते केवळ मतांचे राजकारण करतात – अण्णा हजारे

लोकपाल आंदोलनासाठी कोणत्याही पक्षाचा पाठींबा घेणार नाही; अण्णा हजारे

अहमदनगर : सगळे राजकारणी स्वार्थी आहेत. ते केवळ मतांचे राजकारण करतात, त्यामुळे लोकपाल कायद्यासंबंधी कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा घेणार नाही,’अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटवर लोकपालसंबंधी मांडलेल्या भूमिकेबद्दल विचारले असता हजारे यांनी सर्वच राजकारण्यांची खिल्ली उडवत ही प्रतिक्रिया दिली आहे.

लोकपाल आंदोलनाच्या जनजागृतीसाठी दक्षिण भारतात काही ठिकाणी सभा घेतल्यानंतर हजारे नुकतेच परतले आहेत. नगरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असता प्रसारमाध्यमांनी त्यांना आंदोलनाची तयारी आणि त्यासंबंधी राहुल यांनी केलेले ट्विट यासंबंधी प्रश्न विचारला असता हजारे यांनी ही प्रतिक्रिया दिली.

You might also like
Comments
Loading...