प्रचाराच्या तोफा काही तासांत थंडावणार, बारामतीमध्ये संपूर्ण पवार कुटुंबीय मैदानात

टीम महाराष्ट्र देशा : तिसऱ्या टप्यातील लोकसभा मतदारसंघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे, तत्पूर्वी आज संध्याकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. अटीतटीचा सामना रंगलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात आज राष्ट्रवादी तसेच भाजपने रॅली आणि सभांचा धडाका लावला आहे, तर संपूर्ण पवार कुटुंबीय मैदानात उतरले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात खा. सुप्रिया सुळे पुन्हा एकदा राष्ट्रावादी कॉंग्रेसकडून लोकसभेच्या मैदानात उतरल्या आहेत, तर भाजपकडून दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुरुवातीला सुळे यांना सोपी वाटणारी निवडणूक आता अटीतटीची बनली आहे. भाजपकडून पक्षाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सभा घेतल्या आहेत.

पवारांचा गड असलेल्या बारामतीमध्ये पहिल्यादांच भाजपने जोर लावल्याने राष्ट्रावादीची मात्र दमछाक होत आहे, पुत्र पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी दिल्याने अजित पवार यांना बारामतीसाठी पुरेसा वेळ देता आला नाही, तरीही त्यांनी शेवटच्या टप्यात सभा घेतल्या आहेत. आज शेवटच्या दिवशी शरद पवार, अजित पवार यांच्यासह पक्षातील बडे नेते बारामतीमध्ये सभा घेणार आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघात समाविष्ट विधानसभा
बारामती
पुरंदर
भोर
खडकवासला
दौंड
इंदापूर

एकूण मतदार – २१ लाख १२ हजार ४०८