महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत सर्वपक्षीय खासदारांनी एकजूट दाखवावी : मुख्यमंत्री

टीम महाराष्ट्र देशा : केंद्र शासनाकडे महाराष्ट्राशी संबंधित विविध विषयांचा पाठपुरावा केला जात आहे. पीक विमा योजनेत सुधारणा करणे आवश्यक असून पूर व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी सुमारे 15 हजार कोटी रुपयांपैकी 990 कोटी रुपये मंजूर झाले आहे. उर्वरित निधी मिळण्यासाठी खासदारांनी पाठपुरावा करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस खासदार शरद पवार यांच्यासह राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्य जयंत पाटील, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, दादाजी भुसे, नवाब मलिक, अस्लम शेख, आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते.महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत तिथल्या बांधवांच्या पाठीशी महाराष्ट्र उभा आहे हे दाखवून देण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी एकजूट दाखवावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं पत्र केंद्र शासनाकडे पाठविलं आहे त्याचा एकत्रित पाठपुरावा करावा, असेही त्यांनी सांगितले.

Loading...

मुंबईमध्ये रेल्वे, केंद्र शासनाशी संबंधित विभागाच्या मोकळ्या जागा आहेत त्या परवडणारी घरे बांधण्याकरिता द्याव्यात यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. राज्याच्या प्रश्नांचा एकत्रित पाठपुरावा होण्यासाठी सर्वपक्षीय समिती असावी, अशी सूचना खासदार शरद पवार यांनी यावेळी मांडली. प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी केंद्र शासनाकडे प्रलंबित असून राज्याला हा निधी प्राधान्याने मिळावा यासाठी खासदारांनी प्रयत्न करावे, असे आवाहन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...