चेन्नई सुपर किंग्जचे होमग्राऊंडवरील सर्व सामने रद्द,सामने इतरत्र खेळवले जाणार

टीम महाराष्ट्र देशा- कावेरी पाणी वाटप प्रकरणाचा फटका आता आयपीएलला बसताना दिसत आहे. चेन्नईत होणारे आयपीएलचे सामने इतरत्र खेळवण्यात येणार आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. कावेरी पाणी वाटपावरुन गेले काही दिवस तामिळनाडूतील वातावरण तापलेलं आहे. त्यामुळेच चेन्नईतील सामने इतरत्र खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतल्याचं वृत्त एएनआयनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.

कावेरी पाणीवाटप लवादाची नियुक्ती करण्यासाठी तामिळनाडूतील राजकीय संघटनांनी आंदोलन सुरु केलं आहे. त्यामुळे आयपीएलला सुरक्षा पुरवली जाऊ शकत नाही, असं चेन्नई पोलिसांनी बीसीसीआयला कळवलं. त्यानंतर बीसीसीआयने उर्वरित सर्व सामने दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेतला.कोलकात्याविरुद्धच्या सामन्यातही आंदोलनकर्त्यांनी गोंधळ घातला होता. मैदानाच्या दिशेने चप्पल फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला, ज्यानंतर पोलिसांनी तीन जणांना अटक केली.

You might also like
Comments
Loading...