संपूर्ण महाराष्ट्र माझा बालेकिल्ला – नारायण राणे

कोल्हापूर: संपूर्ण महाराष्ट्र माझा बालेकिल्ला आहे. लोकांना काम करणारा नेता हवा  त्यामुळे अनेक जन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात येण्यास इच्छुक आहेत असल्याच नारायण राणे सांगितले आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थपना केल्यानंतर प्रथमच राणे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून ते कोल्हापूरमधील दसरा चौकात जाहीर सभा घेणार आहेत. त्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उद्धव ठाकरे यांना कोणत्याही खात्याची माहिती नाही. त्यामुळे त्यांना राजकारण कळत का हा प्रश्न आहे. सरकार बरोबर नाक घासत तीन वर्षे काढली त्यांनी नाना पटोलेंकडून काहीतरी घ्यावे असा टोला त्यांनी उद्धव यांना लगावला. दरम्यान महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.