गृहिणी ते संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांचा राजकीय प्रवास

Nirmala-Sitharaman

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ साठी जोरदार मोर्चे बांधणी सुरु केली आहे. याचच चित्र आज मंत्रिमंडळ विस्तारावेळी पहायला मिळाल आहे. मात्र सध्या सर्वत्र चर्चा आहे ती संरक्षणमंत्री पदी वर्णी लागलेल्या निर्मला सितारमन यांची.

nirmala seetaraman oath
nirmala seetaraman oath

इंदिरा गांधीनंतर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेची संरक्षणमंत्री पदावर वर्णी लागली आहे. वाणिज्य मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार असलेल्या निर्मला सीतारमण यांना बढती देऊन अत्यंत महत्त्वाच्या खात्याची  जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. निर्मला सीतारमण यांची कारकीर्द  अत्यंत विलक्षण अशी आहे. अत्यंत कमी कालावधीत त्यांनी बुद्धीमत्तेच्या जोरावर राजकरणात मोठी मजल मारली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी केलेल्या मंत्रिमंडळ फेरबदलामधील सर्वात चर्चेचा आणि आश्चर्यकारक बदल म्हणजे निर्मला सीतारमण यांच्याकडे दिलेली संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी.वाणिज्य मंत्रालयाचा कारभार सांभाळताना निर्मला सीतारमण यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. तसेच निर्मला सीतारमण यांच्या कामावर पंतप्रधान नरेंद्र मोदीही खुश होते, त्यामुळे त्यांना बढती मिळाली असल्याचे सांगितले जात आहे.

nirmala seetaraman

निर्मला सीतारमन यांचा आजपर्यंतचा प्रवास
निर्मला यांनी त्यांचे पदवीचे शिक्षण सितालक्ष्मी रामासामी कॉलेजमधून पूर्ण केले आहे . तर मास्टर्स डिग्री JNU मधून पूर्ण केली. 1986 मध्ये परकला प्रभाकर यांच्याशी विवाह करून त्या लंडनला स्थायिक झाल्या , तिथे कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये त्यांनी नाव कमावले. पण अखेर 1991 मध्ये निर्मला भारतात परतल्या. त्यांना एक मुलगीही आहे. 2003 ते 2005 दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगासाठी काम करताना त्या सुषमा स्वराज यांच्या संपर्कात आल्या. सुषमा स्वराज यांनी निर्मला सीतारमण यांच्यावर प्रभावित होऊन पक्षात त्यांची शिफारस केली होती. पुढे निर्मला यांनी 2006 मध्ये भाजपात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी पक्षामध्ये अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी स्वीकारली.
Nirmala-Sitharaman-

रवीशंकर प्रसाद यांच्या नेतृत्त्वात निर्मला सीतारमन यांनी भाजप प्रवक्त्यांच्या फळीत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे . 2010 मध्ये नितीन गडकरी भाजपाध्यक्ष असताना त्या पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून नियुक्त झाल्या. प्रत्येक परिस्थितीत भाजपची योग्य भूमिका मांडण्याचे काम त्यांनी केले. हळूहळू दिल्लीतच नव्हेत तर पक्षाच्या मुख्यालयामध्येही त्या एक महत्त्वाचा चेहरा बनल्या.

पुढे निर्मला सीतारमण यांची आंध्रप्रदेशातून राज्यसभेवर नियुक्तीही झाली होती. त्यावेळी टीडीपी पक्षाने त्यांच्या खासदाराच्या मृत्यूनंतर सीतारमण यांच्यासाठी ही जागा भाजपला सोडली होती. सध्या त्या कर्नाटकातून राज्यसभा सदस्य आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांची महत्वाची भूमिका होती.