‘कोरोनाची परिस्थिती पाहता या महिन्यात होणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलाव्यात’

jitendra Awhad

मुंबई: राज्यातील कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने केलेली नियमावली, उपाययोजना यांची वस्तुनिष्ठ माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवितानाच माध्यमांनी जनजागृती करावी. साथीच्या आजाराचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हा लढा यशस्वी करूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

विविध माध्यमांमध्ये आरोग्य विषयक पत्रकारिता करणाऱ्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी दृरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला आहे. दरम्यान राज्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र कोरोणाची परिस्थिती पाहता या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. यामध्ये आता एमपीएससीच्या उमेदवारांसह राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे सर्व परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘सध्याची करोनाची परिस्थिती पाहता या महिन्यात होणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी विद्यार्थ्यांच्या वतीने मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो’. असे ट्विट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :