“ताई, तोंड गोड करा ! तुमच्यामुळे आमची सेवानिवृत्ती टळली”

टीम महाराष्ट्र देशा : सध्या सभागृह आणि रस्त्यावर सुद्धा अंगणवाडी सेविकांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अंगणवाडी सेविकांवरील ‘मेस्मा’ स्थगित केल्यामुळे या मुद्द्यावर ठाम असलेल्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे या कुठेतरी नाराज झाल्याच बोललं जात होत. पण या मध्येच पंकजाताईंचे तोंड अंगणवाडी सेविकांनीच गोड केल आहे.

‘३१ मार्चला सेवानिवृत्त होत असलेल्या अंगणवाडी सेविकांनी महिला व बाल विकासमंत्री पंकजाताईं मुंडेंना पेढे भरवून भावोद्गार काढले.’ पंकजा मुंडे यांनी, नुकतेच अंगणवाडी सेविकांच्या सेवानिवृत्तिचे वय ६५ वर्षे करून संघटनेच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. या निर्णयामुळे आनंदीत झालेल्या, सातारा जिल्ह्यातील माण येथील सेवानिवृत्तिच्या उंबरठ्यावरील छाया परशुराम शिपटे व अन्य अंगणवाडी सेविकांनी ‘रॉयलस्टोन’ या निवासस्थानी पंकजा मुंडे यांची भेट घेऊन पेढे वाटून त्यांचे आभार मानले

दरम्यान, अंगणवाडी सेविकांच्या सेवानिवृत्तिचे वय 65 वर्षे करून सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे आनंदीत झालेल्या माण जिल्हा सातारा येथील, छाया परशुराम शिपटे व अन्य अंगणवाडी सेविकांनी आज ‘रॉयलस्टोन’ निवासस्थानी माझी भेट घेतली आणि माझे आभार मानून अभिनंदन केले. या आशयाचे ट्विट केले आहे.