आघाडीसाठी अजित पवारांशी बोललो…पण राष्ट्रवादीचे दाखवायचे दात वेगळे – कदम

ramdas_kadam

मुंबई: अहमदनगरमध्ये सर्व भाजप विरोधी पक्षांना एकत्र घेत आघाडी करण्यासाठी आमचे प्रयत्न होते . यासाठी आपण अजित पवार आणि विखे पाटील यांच्याशी बोललो होतो, असा गौप्यस्फोट पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. विधनासभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच राष्ट्रवादीने भाजपला पाठींबा दिला होता. त्यामुळे आम्ही सत्तेतून बाहेर पडल्यावर ते भाजपशी आघाडी करण्याची भीती वाटत असल्याचं कदम यावेळी म्हणाले. तसेच राष्ट्रवादी भाजपासोबत असल्याचं अहमदनगर महापालिकेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची टीका त्यांनी यावेळी केली.