​‘गली बॉय’च्या सेटवरचे आलिया भट्ट व रणवीर सिंगचे फोटो लिक!

alia-bhatt-and-ranveer-singhs-pics-leaked-from-zoya-akhtars-next-film-gully-boy

टीम महाराष्ट्र देशा : अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या ‘गली बॉय’ या आगामी चित्रपटाचे शूटींग  सुरु आहे. जोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटो लिक झाले आहेत आणि हे फोटो व्हायरल होत आहेत. alia-bhatt-and-ranveer-singhs-pics-leaked-from-zoya-akhtars-next-film-gully-boy

या फोटो मध्ये आलिया एका तरूण मुस्लिम मुलीच्या भूमिकेत दिसतेय. व रणवीरला ओळखणेही कठीण आहे. एका स्लम एरियात या चित्रपटाचे शूटींग झाले. याच ठिकाणचे हे फोटो आहेत.

alia-bhatt-and-ranveer-singhs-pics-leaked-from-zoya-akhtars-next-film-gully-boy

रणवीरचे या चित्रपटातील लूक त्याच्या ‘बँड बाजा बारात’, ‘लेडिज वर्सेस रिकी बहल’ या चित्रपटातील लूकशी बरेच मिळते जुळते आहेत.  ‘पद्मावत’मध्ये अलाऊद्दीन खिल्जीची निगेटीव्ह भूमिका साकारणारा हाच तो रणवीर,यावर त्याचे हे फोटो पाहिल्यानंतर क्षणभर विश्वास बसत नाही.

alia-bhatt-and-ranveer-singhs-pics-leaked-from-zoya-akhtars-next-film-gully-boy

‘गली बॉय’ एका रिअल लाईफ स्टोरीवर आहे. या चित्रपटासाठी आधी रणबीर कपूरचे नाव चर्चेत होते. यानंतर वरूण धवनच्या नावाचीही चर्चा झाली आणि रणवीरच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. रणवीर व आलिया या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

alia-bhatt-and-ranveer-singhs-pics-leaked-from-zoya-akhtars-next-film-gully-boy

या चित्रपटात रणवीर व आलिया यांच्यासोबतच अभिनेत्री कल्की कोच्लिन ही सुद्धा एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. कल्कीने जोयाच्या ‘जिंदगी न मिलेगी दोबारा’मध्ये काम केले आहे.

blankरणवीरचा ‘पद्मावत’ हा चित्रपट प्रदर्शनास तयार आहे. याशिवाय ‘सिम्बा’ या आणखी एका चित्रपटात रणवीर दिसणार आहे. आलियाचा  ‘राजी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यानंतर ती ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटातही दिसणार आहे. यात तिच्या सोबत रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे.

alia-bhatt-and-ranveer-singhs-pics-leaked-from-zoya-akhtars-next-film-gully-boy

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर