Share

Alia Bhatt | कन्यारत्न प्राप्तीनंतर आलिया भटने केली पहिली सोशल मीडिया पोस्ट

मुंबई: आज कपूर कुटुंबामध्ये एका नव्या लक्ष्मीच्या आगमन झालं. होय! आज आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आई-बाबा झाले आहेत. आज आलियाने एका गोंडस लक्ष्मी (Baby Girl) ला जन्म दिला आहे. आज सकाळीच आलियाला मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी भरती करण्यात आले होते. दरम्यान, आलियाने आज आपल्या पहिल्या आपत्याला जन्म दिला आहे. आलिया आणि तिच्या बाळाची प्रकृती उत्तम असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्याचबरोबर भट आणि कपूर कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तर, या बातमीने आली आणि रणबीरचे चाहते देखील आनंदात आहे.

कन्यारत्न प्राप्तीनंतर आलिया भट (Alia Bhatt) ने केली पोस्ट

आलिया भट आणि रणबीर कपूर यांना आज कन्यारत्न प्राप्त झाले आहे. यानंतर आलिया भटने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वरती ने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिने लिहिले आहे, ” आमच्या बाळाचे आगमन झाले असून, ती एक मॅजिकल मुलगी आहे. आमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्याचबरोबर आम्ही पालक होण्यासाठी उत्सुक आहोत. रणबीर आणि आलिया कडून खूप खूप प्रेम.”

12.05 मिनिटांनी आलियाने मुलीला दिला जन्म

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट हिने मुंबईतील रिलायन्स रुग्णालयांमध्ये 12.05 मिनिटांनी आपल्या मुलीला जन्म दिला आहे. दरम्यान, रणबीर कपूर, सोनी राजदान आणि नीतू कपूर हे तिघेही तिच्यासोबत रुग्णालयात हजर होते. आलिया आई झाल्यानंतर कपूर आणि परिवार खूप आनंदी आणि उत्साहीत आहे. तर अभिनेत्री नीतू कपूर हिने तिच्या इंस्टाग्राम वर पोस्ट शेअर करत तिचा आनंद व्यक्त केला आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या बद्दल बोलायचं झालं तर, हे दोघ त्यांच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या सेटवर प्रेमात पडल्याची माहिती समोर आलेली आहे. 2018 मध्ये या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ते दोघे रिलेशनशिप मध्ये आले होते. लग्नाआधी हे दोघे तब्बल तीन वर्षे एकमेकांना डेट करत होते.

महत्वाच्या बातम्या 

मुंबई: आज कपूर कुटुंबामध्ये एका नव्या लक्ष्मीच्या आगमन झालं. होय! आज आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) …

पुढे वाचा

Entertainment

Join WhatsApp

Join Now