आलियाचा लाईफ पार्टनर बद्दल खुलासा

आलिया भट्ट तिच्या आगामी ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ सिनेमात मजेशीर भूमिका केली असून यात ती वधू बनणार आहे. तिने नुकताच तिला कसा लाईफ पार्टनर हवा आहे याबाबत खुलासा केला आहे. आलियाने म्हटले की, तिचा लाईफ पार्टनर एक मित्र असावा. माझा आणि माझा लाईफ पार्टनरमध्ये मैत्रीचे नाते असले पाहिजे.
आमचे विचार एकमेकांशी मिळाले पाहिजे. मला माझा कामावर खूप प्रेम आहे. लग्नानंतर किंवा मुले झाल्यानंतर मला सिनेसृष्टीतून बाहेर जायचे नाही. त्यामुळे माझा लाईफ पार्टनरने माझे काम समजून घ्यावे. आलिया म्हणते की, ती कधीही अॅरेंज मॅरेज नाही करणार. तिने म्हटलं की, तिचा लाईफ पार्टनर तिच्या विचारांसारखा असावा. पालकांना माहित नसतं की मुलाचे विचार कसे आहेत त्यामुळे मी माझा लाईफ पार्टनर स्वत: निवडणार आहे.