लष्करी विमानाला अपघात, तब्बल 257 सैनिकांचा मृत्यू

टीम महाराष्ट्र देशा- अल्जेरियामध्ये लष्करी विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातात २५० जण ठार झाले आहेत. अल्जेरियाची राजधानी बोयुफारीक विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर लगेचच हे विमान शेतामध्ये कोसळले. अपघाताच्यावेळी Ilyushin Il-78 या लष्करी वाहतूक विमानामध्ये मोठया प्रमाणावर सैनिक होते. २५७ जण या विमान अपघातात ठार झाल्याचे अल्जेरियामधील वृत्तवाहिनीने म्हटले आहे.

या अपघातानंतर अल्जेरियात एकच खळबळ उडाली. सध्या प्रशासनाने तातडीचं मदत आणि बचावकार्य सुरु केलं आहे. 14 अँम्ब्युलन्स आणि 10 ट्रकद्वारे जखमींना रुग्णालयात हलवण्यात येत आहे.दरम्यान, सोशल मीडियात या अपघातासंबंधी एक व्हिडीओ शेअर केला जात आहे. या व्हिडीओत दुर्घनाग्रस्त विमानातून धूर येताना दिसत असून, आजूबाजूला मदत आणि बचावकार्य सुरु असल्याचं दिसत आहे .

घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरु झाले असून १४ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. बोयुफारीक उत्तर अल्जेरियात असून भूमध्य समुद्रापासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. फेब्रुवारी २०१४ मध्ये अल्जेरियन एअरफोर्सचे लॉकहीड सी-१३० हरक्युलस विमान पूर्व अल्जेरियाच्या पर्वतरांगांमध्ये कोसळले होते. त्या दुर्घटनेत ७७ जणांचा मृत्यू झाला होता.

Comments
Loading...