दिल्लीत आडवाणी आणि राज्यात माझी अवस्था सारखीच ; एकनाथ खडसेंनी व्यक्त केली खंत

जळगाव : अनेक वर्ष आपण पक्षासाठी मेहनतीने कार्य केल. लालकृष्ण आडवाणींची परिस्थितीही तीच आहे. आयुष्यभर त्यांनीही मेहनत केली, आता नव्यांना संधी आणि जुन्यांनी मार्गदर्शन करावं असं चित्र असल्याचं वक्तव्य एकनाथ खडसेंनी जळगावात केलं आहे.

भाजपमध्ये आपली अवस्था राष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणीं यांच्यासारखी झाली आहे, आता नव्यांना संधी आणि जुन्यांना मार्गदर्शन असंच चित्र उरल्याचं सांगत खडसेंनी अप्रत्यक्षरित्या सरकारवर नाराजी व्यक्त केली.

जळगाव जिल्हा भाजपच्या संघटन बैठकीत खडसेंचं पुनर्वसन करण्याचा ठराव करावा, यासाठी खडसे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन करुन पक्षाच्या शिस्तीचं पालन करण्याचा सल्ला खडसेंनी दिला