१६५ पोल्ट्री फार्म चालकांना सतर्कतेचा इशारा

नांदेड : परभणीमध्ये ‘बर्ड फ्ल्यु’ ने शेकडो कोंबड्या मृत झाल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील पोल्ट्री फार्म चालकांनी धास्ती घेतली आहे. दरम्यान, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी जिल्ह्यातील १६ तालुक्यात ३२ शीघ्र कृतीदल स्थापन करण्यात आले असून जिल्ह्यातील १६५ पोल्ट्री फार्म चालकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

बुधवारी किनवट येथील जळकेवाडी येथे कोंबड्या दगावल्याने ‘बर्ड फ्ल्यु’ची साथ असल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, जिल्ह्यात बर्ड फ्लूचा संभाव्य धोका होऊ नये, यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे पाच सदस्यांचे एक याप्रमाणे ३२ शीघ्र कृती दल पथक स्थापन करण्यात आले आहे. आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेशी आम्ही समन्वय साधूत असून जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन डॉ. रत्नपारखी यांनी केले आहे.

जिल्ह्यात जवळपास १६५ पोल्ट्री फार्म असून यात अंदाजित ४५ हजार पक्षी आहेत. या पोल्ट्री फार्मच्या संपर्कात राहण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही डॉ. रत्नपारखी यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या