अण्णांच्या गावात सरकारी कर्मचाऱ्यांना हाकलले गावाबाहेर

आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी घेतला आक्रमक पवित्रा

टीम महाराष्ट्र देशा : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या मागण्या मान्य होईपर्यंत गावात कोणतीही सरकारी सेवा नको, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. अण्णांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी हा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

दरम्यान, २०११ मध्ये अण्णा हजारे यांनी दिल्लीत केलेल्या आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. मात्र, आंदोलनाकडे सरकार फारसे गांभिर्याने घेत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे अण्णांना पाठींबा देण्यासाठी ग्रामस्थांनी गावातील सर्व सरकारी काम बंद केले आहे.

गेल्या ६ दिवसांपासून अण्णा राजधानीतील जंतर मंतरच्या मैदानावर उपोषणाला बसले आहेत. सरकारच्या वतीने जलसंदापमंत्री गिरीश महाजन यांनी अण्णांची भेट घेतली. पण, अण्णांच्या महत्त्वाच्या मागण्या सरकारने अद्याप मान्य केलेल्या नाहीत. त्यामुळे राळेगणसिद्धीचे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

You might also like
Comments
Loading...