नवी दिल्ली : कोरोना साथीच्या कालावधीत देशात लॉकडाउन लागू करण्यात आल्याने लोकांकडून बाहेर जाणे टाळण्यासाठी ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाईन ट्रांजेक्शन, त्याचबरोबर अनेकदा ग्राहक वेगवेगळ्या ऑफिसला देखील बळी पडत असतात. याचा फायदा अनेक सायबर गुन्हेगारांकडूनही घेतला जात असल्याच्या अनेक घटना आपल्या समोर आल्या आहेत. त्यामुळे सायबर सुरक्षेबाबत अधिक जागरूक होणं आवश्यक आहे.
बँकेचे व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने अगदी कमी वेळात सहज आणि वेगाने होतात. त्यामुळेच ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करण्याकडे हल्ली अनेकांचा अधिक कल असतो. इंटरनेट आणि स्मार्टफोन्समुळे बँकिंग खूपच सोपे केले आहे. मात्र सध्या ऑनलाईन फ्रॉड वाढले आहेत. अशा फ्रॉडपासून वाचण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने मोलाचा सल्ला दिला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या ग्राहकांना वेळोवेळी सावध करत असते. यावेळी ही बँकेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ग्राहकांना अलर्ट केलं आहे.
त्यांनतर आता स्टेट बँकेने सर्व ग्राहकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. सध्या अनेक लोक एसबीआयच्या नावाने ग्राहकांना फोन करून वैयक्तिक माहिती विचारत आहेत. त्यामुळे तुम्हालाही असा कोणता फोन आला तर सावध राहा आणि तपासणी केल्याशिवाय आपली खासगी माहिती शेअर करू नका असं बँकेकडून सांगण्यात आलं आहे. नाहीतर तुम्हाला याचा मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
काही सायबर हॅकर्स बँक अधिकारी केवायसी व्हेरिफाय करण्याच्या नावाखाली लोकांना कॉल करत आहेत. आपण त्यांना माहिती देताच खात्यातून पैसे काढले जात आहेत. अशा कॉल किंवा मेसेजपासून सावध रहा, असे बँकेने स्पष्ट ट्वीट करून केले आहे. अशा असंख्य तक्रारीही बँकेकडे आल्या आहेत. त्यानंतर ही बाब बँकेपर्यंत पोहोचली की हा कोणी बँकेचा माणून नसून फसवणूक करणारा आहे.
KYC सत्यापन का अनुरोध करने वाले कपटपूर्ण कॉल या संदेशों से खुद को सुरक्षित रखें। जालसाज आपके व्यक्तिगत विवरण हासिल करने के लिए बैंक/ कंपनी प्रतिनिधि होने का नाटक करते हुए एक फोन कॉल करता है या टेक्स्ट संदेश भेजता है। ऐसे मामलों की रिपोर्ट करें: https://t.co/d3aWRrx4G8 #KYCFrauds pic.twitter.com/7rwkBlgMWh
— State Bank of India (@TheOfficialSBI) January 13, 2021
एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणारा कंपनीचा प्रतिनिधी असल्याचं भासवून तुमची वैयक्तिक माहिती गोळा करेन आणि तुमच्या खात्यामधून सगळे पैसे काढून घेईन. असं काहीही तुमच्यासोबत घडलं तर तात्काळ cybercrime.gov.in वर तक्रार दाखल करा.
महत्वाच्या बातम्या
हनीट्रॅपमुळे फक्त मुंडेंची नाही तर महाराष्ट्राच्या संस्कृतीची बदनामी होत आहे – संजय राऊत
कर्ज देणाऱ्या ॲप्स संदर्भात आरबीआय आणि केंद्र सरकारला उच्च न्यायालयाची नोटीस
रोहित शर्माने केली टीकाकारांची बोलती बंद
‘हा’ अनोखा विक्रम करणारा टी नटराजन ठरला पहिलाच भारतीय खेळाडू
सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत मुंडेंच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही; शरद पवारांची ठाम भूमिका