विद्या बालनची ‘मोंजोलिका’ भूमिका बघून अक्षयच्या मुलाला वाटायची भिती

vidya.

मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक हॉरर चित्रपटापैकी एक असलेला ‘भूल भुलैया’ हा चित्रपट आहे. या चित्रपटातील अभिनेत्री विद्या बालनची भूमिका सर्वांच्या चांगलीच लक्षात आहे. मात्र या चित्रपटाबद्दल सांगायच झाल तर , अभिनेता अक्षय कुमारच्या मुलाबद्दल खुप गंमतीशीर किस्सा आहे.

१२ ऑक्टोबर, २०१२ मध्ये अक्षय कुमार आणि विद्या बालन अभिनित ‘भूल भुलैया’ चित्रपट प्रदर्शित झाला होता.  या चित्रपटाचे  काही मजेशीर किस्से आहेत. ती म्हणाली की,’अक्षय कुमारचा मुलगा आरव मला खूप घाबरायचा. खरंच हे माझ्यासाठी खूप मजेशीर होते. कारण लोक मला माझ्या नावाने नाही, तर ‘मोंजोलिका’ म्हणून ओळखू लागले होते, आणि ते मला घाबरतही होते’. पुढे अक्षयची पत्नी ट्विंकलने सांगीतले की, आरव एकदा मस्त गाणी लावून नाचत होता, त्यावेळी अचानक त्याला त्या गाण्याची आठवण आली आणि तो खूप घाबरला. तो धावत माझ्याकडे आला, तेव्हा तो भीतीने घामाघूम झाला होता.

या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार  असून आता १४ वर्षे पूर्ण झाल्यामुळे टी-सीरिज याचा पुढील भाग बनवत आहे. यामध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच तब्बू देखील चित्रपटात झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. यामध्ये कार्तिक अक्षयप्रमाणे वेशभूषा केलेला दिसला. ‘भूल भुलैया २’ साल २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सर्व सिनेचाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या