अक्षय कुमारचा आगामी ‘पॅडमॅन’ चित्रपट 26 जानेवारीला प्रदर्शित

अक्षय या चित्रपटात अरुणाचलम यांची भूमिका साकारणार आहे.

वेब टीम :- २०१८ च्या प्रजासत्ताक दिनादिवशी अक्षय कुमारचा बहुचर्चित पॅडमॅन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’ या चित्रपटाचं पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आलं आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आर बाल्की यांनी केले आहे. अक्षयने चित्रपटाच्या फर्स्ट लूकसोबतच प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. यापूर्वी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख १३ एप्रिल ठरली होती.

यात अक्षय घाटाच्या बाजूला सायकलवर दोन्ही हात वर करुन बसलेला या फर्स्ट लूकमध्ये पाहायला मिळतो आहे. सोनम कपूरचीही अक्षयसोबतच चित्रपटात भूमिका असणार आहे. ‘पॅडमॅन’ हा चित्रपट पहिल्यांदा सॅनिटरी नॅपकिन बनवणाऱ्या अरुणाचलम मुरूगनाथ यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. अक्षय या चित्रपटात अरुणाचलम यांची भूमिका साकारणार आहे.

You might also like
Comments
Loading...