अक्षयने असे काय केले कि काही मिनिटांतच भारतीय सैनिकांसाठी जमा झाले 6.5 कोटी

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा नेहमीच सामाजिक कामात अग्रेसर असतो. अक्षयचे देश आणि आपल्या सैनिकांप्रती असणारे प्रेम हे सर्वश्रुत आहे. याचेच चित्र सध्या पहायला मिळत आहे. एप्रिल महिन्यात अक्षयने भारतीय सैनिक व वीर जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी गृह मंत्रालयाला एक वेबसाईट बनविण्याची विनंती केली होती. अक्षयच्या विनंतीवर ‘भारत के वीर’ नामक वेबसाईट गृह मंत्रालयाने बनविली. या वेबसाईटला जगभरातील भारतीय नागरिकांनी देखील भरभरू प्रतिसाद दिला आहे.

नुकतेच अक्षयला एका जागतिक गुतंवणूक परिषदेत बोलण्यासाठी आमंत्रित केले होते. या परिषदेसाठी जगभरातील अनेक मोठे उद्योजक उपस्थित होते. यावेळी बोलताना अक्षयने भारतीय सैनिकांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘भारत के वीर’ या वेबसाईट बद्दल उपस्थिताना माहिती दिली. अक्षयने दिलेल्या माहितीने उपस्थित अनेक उद्योजक प्रभावित झाले. आणि बघता बघता काही मिनिटांतच ६.५ कोटी इतकी रक्कम भारत के वीर जवानांसाठी जमा झाली. अक्षयच्या याच कामाची चर्चा सर्वत्र चर्चेचा विषय आहे.

You might also like
Comments
Loading...