fbpx

राज ठाकरे यांच्या टीकेला असं दिलं अक्षय कुमारने उत्तर

akshay kumar and raj thakrey

मुंबई : ‘माझ्यावर राज ठाकरेंनी कॅनडाच्या नागरिकत्वावरुन केलेल्या टीकेबद्वदल मला वाईट वाटले नाही. लोकशाहीत प्रत्येकाला त्याचं मत व्यक्त करण्याचा हक्क आहे असं म्हणत अभिनेता अक्षय कुमार याने नागरिकत्वाच्या प्रश्नावरून सुरु झालेल्या वादावर पडदा टाकला आहे. ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार सोहळ्यात बोलताना अक्षयने हि प्रतिक्रिया दिली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडव्याच्या सभेत अक्षय कुमारच्या नागरिकत्वावरुन टीका केली होती. त्यानंतर अक्षयकुमारच्या नागरिकत्वाचा मुद्दा चर्चेत आला होता. यानंतर अक्षय कुमारने केलेल्या सामाजिक कार्याची यादी सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती. एरव्ही राज ठाकरे यांच्या प्रत्येक भूमिकेबरोबर सोबत असणारे चाहते यावेळी मात्र अक्षयच्या बाजूने उभा राहिल्याचे चित्र पहायला मिळाले होते. दरम्यान, यावेळी बोलताना अक्षयने आपण जे काही आहोत ते महाराष्ट्रामुळेच अशी प्रांजळ कबुलीही दिली. ‘मी आजपर्यंत जे काही कमावलेय ते महाराष्ट्रामुळे. मी महाराष्ट्रामुळे इथपर्यंत पोहोचलोय’ असंही यावेळी अक्षय म्हणाला.