Share

Akshay Kumar | अक्षय कुमार आगामी चित्रपटातून देणार लैंगिक शिक्षणाने धडे

Akshay Kumar | सौदी : बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या हेरा फेरी 3 (Hera Pheri 3) चित्रपटामुळे चर्चेत आहे. दररोज काही ना काही चित्रपटाशी संबंधित अपडेट येत आहे. त्याचबरोबर अक्षय कुमारच्या ‘वेडात मराठे वीर दौड़ले सात’ चित्रपटाची चित्रीकरण सुरू झाल्याची माहिती अभिनेत्यानी त्याच्या ट्विटर अकाउंट वरून दिली आहे. अशात आता अक्षय कुमारचा येणारा अजून एक आगामी चित्रपट लैंगिक शिक्षणाचे (Sex Education) धडे देणार असल्याची माहिती मिळाली आहे. ‘पॅडमॅन’, ‘टॉयलेट-एक प्रेमकथा’ या चित्रपटानंतर अक्षय कुमार आता अजून एक सामाजिक संदेश देणारा चित्रपट घेऊन येणार आहे.

सौदीमध्ये सुरू असलेल्या ‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’मध्ये अक्षय कुमारने त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल भाष्य केलं आहे. या सोहळ्यामध्ये त्याच्या चित्रपटाबद्दल बोलताना तो म्हणाला की,”प्रत्येक चित्रपटाप्रमाणे माझा आगामी चित्रपट देखील प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करणार आहेत. या चित्रपटामध्ये कोर्टरूम ड्रामा आहे. त्याचबरोबर या चित्रपटांमध्ये एक नागरिक शाळेत लैंगिक शिक्षण सक्तीचे करावे यासाठी कोर्टात धाव घेताना दिसणार आहे.” हे बोलत असताना अक्षय कुमारने चित्रपटाच्या नावाचा कोणताही उल्लेख केलेला नाही.

दरम्यान, अक्षय कुमारच्या ‘वेडात मराठे वीर दौड़ले सात’ या पहिल्या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आहे. ही माहिती अक्षय कुमारने ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांनासोबत शेअर केली होती. अक्षय कुमारने ट्विट करत लिहिले आहे की,”आज पासून मी ‘वेडात मराठे वीर दौड़ले सात’ ती चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करत आहे. या चित्रपटांमध्ये मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याचे सौभाग्य लाभले आहे. मी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेत घेऊन आणि माँसाहेब जिजाऊ यांच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे.

‘वेडात मराठे वीर दौड़ले सात’ या चित्रपटाबरोबरच अक्षय कुमार ओ माय गॉड 2, कॅप्सूल गिल, सेल्फी यासारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अक्षय कुमारचे नुकतेच रिलीज झालेले चित्रपट राम सेतू आणि रक्षाबंधन हे बॉक्स ऑफिसवर काही जास्त चांगला कमाल करू शकले नाही.

महत्वाच्या बातम्या 

Akshay Kumar | सौदी : बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या हेरा फेरी 3 (Hera Pheri 3) चित्रपटामुळे चर्चेत …

पुढे वाचा

Entertainment

Join WhatsApp

Join Now