मुंबई: बॉलीवूड (Bollywood) सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) कमर्शियल भूमिका साकारण्यासाठीच प्रसिद्ध नाही. तर, तो रियल लाईफ (Real Life) भूमिका साकारण्यामध्ये देखील माहीर आहे. रुस्तम, एअरलिफ्ट, केसरी, पॅडमॅन इत्यादी चित्रपटांच्या माध्यमातून अक्षय कुमारने आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्याचबरोबर त्याने रियल लाईफ हिरोच्या बायोपिकमध्ये भूमिका साकारून मोठ्या पडद्यावर आपलं वर्चस्व गाजवलं आहे. अशा परिस्थितीत अक्षय कुमार अजून एका रियल हिरोच्या बायोपिकमध्ये दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अक्षय कुमार (Akshay Kumar) दिसणार अजून एका बायोपिकमध्ये
बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार रिअल लाईफ हिरो बायोपिकमध्ये भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर त्याने अनेक हिरोंच्या भूमिका करून बॉलीवूडमध्ये स्वतःला सिद्ध केला आहे. अशा तो आता पूजा इंटरटेनमेंट निर्मित बायोफिक मध्ये दिगवंत अभियंता सरदार जसवंत सिंग यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. 1989 मध्ये भारतातील सर्वात मोठ्या बचत मोहिमेचे नेतृत्व करणारे दिगवंत सरदार जसवंत सिंग हे एक अभियंता होते. त्यांनी कोळसाखान्यातून 65 घाण कामगारांना वाचवले होते. त्यांच्या या कर्तुत्व निमित्त या दिवसाच्या आठवण म्हणून 16 नोव्हेंबर हा ‘बचाव दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो.
आज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सरदार जसवंत सिंग यांनी आदरांजली वाहिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर पोस्ट करत तयांना आदरांजली वाहिली आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, ” 1989 मध्ये कोळसाखान्यातून 65 कामगारात वाचवण्यात स्वर्गीय सरदार यशवंत सिंग यांनी आपल्या जीवाची आहुती दिली होती. आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे.”
Grateful to you @JoshiPralhad ji, for recalling India’s first coal mine rescue mission – this day 33yrs ago.
मेरा सौभाग्य है कि मैं #SardarJaswantSinghGill जी का किरदार अपनी फ़िल्म में निभा रहा हूँ. It’s a story like no other!@easterncoal— Akshay Kumar (@akshaykumar) November 16, 2022
दरम्यान, अक्षय कुमारने त्यांच्या ट्विटला उत्तर दिले की, ” खरच या नायकाची भूमिका साकारणे सन्मानाची गोष्ट आहे. तीस वर्षापूर्वी भारताच्या पहिल्या कोळसाखान बचाव मोहिमेबद्दल आठवण करून दिल्याबद्दल प्रल्हाद जोशी जी तुमचे आभार. हे माझे भाग्य आहे की, मी या चित्रपटांमध्ये सरदार जसवंत सिंग यांची भूमिका साकारत आहे.”
Remembering Late #SardarJaswantSinghGill on this day ,who rescued the lives of miners who were stuck in the coal mines of Raniganj under very difficult circumstances. It is indeed an honour and privilege to showcase his heroic act in our next film 🙏🏼 https://t.co/wXmzjQJMqh
— Vashu Bhagnani (@vashubhagnani) November 16, 2022
त्याचवेळी दुसरीकडे चित्रपटाचे निर्माते वाशु भावनानी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलरवरून या चित्रपटाची घोषणा केली. त्यांनी लिहिले की, “आजच्या दिवशी स्वर्गीय सरदारजी यांचे स्मरण केले जात आहे. त्यांनी कठीण परिस्थितीत राणीगंज कोळसा खाणीत अडकलेले खाण कामगारांचे प्राण वाचवले होते. आमच्या पुढच्या चित्रपटात त्यांचे वीर अभिनय दाखवणे. ही खरोखरच सन्मानाची गोष्ट आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Naresh Mhaske | “हिंदुत्ववादी विचारांच्या पाठीत खंजीर कोणी खुपसलं” ; नरेश म्हस्के यांचा संजय राऊतांना सवाल
- IPL 2023 | पोलार्डच्या निवृत्तीनंतर रोहित शर्माने शेअर केली पोस्ट, म्हणाला..
- Sushma Andhare | “मी शिवबंधन सोडायला तयार आहे, पण…”; सुषमा अंधारे असं का म्हणाल्या?
- Sushma Andhare | “आमचे एकनाथ भाऊ घरात नसतात ते…” ; सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
- Vivo Mobile Launch | भारतात लवकरच लाँच होणार Vivo चा ‘हा’ Mobile