Toilet ek prem katha- अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज

मुंबई: हागणदारी मुक्त समाजासारख्या अत्यंत महत्वाच्या सामाजिक विषयावर आधारित ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या अक्षय कुमारच्या आगामी सिनेमाचा ट्रलेर रिलीज करण्यात आला आहे. अक्षय कुमारने प्रमोशनचा फंडा म्हणून हा ट्रेलर फेसबुकद्वारे प्रत्येक चाहत्याला मेसेजद्वारे पाठवला आहे. या ट्रेलरला सोशल मीडियातून जोरदार पसंती मिळत आहे.

घरामध्ये शौचायलय का गरजेचं आहे, हा संदेश या सिनेमातून देण्यात आला आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकर अक्षय कुमारसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अनुपम खेरही या सिनेमात दिसतील. अक्षय कुमार हा सामाजिक संदेश देणा-या सिनेमांमुळे अधिक लोकप्रिय होत आहे. त्यात त्याच्या या सिनेमाची उत्सुकता अधिक वाढली आहे.

दरम्यान सिनेमाचा ट्रेलर चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यातील इनिंग ब्रेक दरम्यान रिलीज करण्यात आला. हा महत्वपूर्ण सामना पाहता यावा, यासाठी अक्षय कुमारने ट्रेलर इनिंग ब्रेकमध्ये रिलीज केला.